शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिंदोडी (तेजस फडके) सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभल. आपल्या शिरुर-हवेली मतदार संघाची रचना जर पाहिली तर ती मोठया प्रमाणात विस्तृत असल्याने काही ठिकाणी निधी कमी जास्त झाला असेल पण अशोक बापूंनी सगळ्याच गावांना थोड्याफार प्रमाणात का होईना निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी केले.

शिंदोडी ते निमोणे या आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्या फंडातुन झालेल्या आठ कोटी रुपयांच्या रस्त्याचे उदघाटन बुधवार (दि ९) रोजी सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, विकासनिधी टाकत असताना सर्वसामान्य आणि सर्वसमावेशक घटकांच्या हिताचा विचार करुन हा निधी टाकला जातो. तुम्ही रावसाहेब दादांवर प्रेम केलं तसंच बापूंवर पण प्रेम केलं.

 

त्यामुळेच तुमच्या पाठिंब्यावर पुणे जिल्ह्यातुन एकमेव निष्ठावंत आमदार म्हणुन बापु पवार साहेबांच्या सोबत कठीण काळात उभे राहिले. आपल्या पुणे जिल्ह्यातुन एकमेव खासदार डॉ अमोल कोल्हे आणि एकमेव आमदार अ‍ॅड अशोक पवार हे संकटाच्या काळात पवार साहेबांसोबत ठामपणे उभे राहिले याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असल्याचेही यावेळी सुजाता पवार यांनी सांगितले.

 

यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष विजय भोस यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका समन्वयिका सुमन वाळुंज,वडगाव रासाई येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन पवार, शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज, बलभीम वाळुंज, शिवाजी वाळुंज, सुनिल वाळुंज, भगवंत वाळुंज, विठ्ठलराव वाळुंज, निमोणे गावचे माजी सरपंच दिलीप काळे, युवा कार्यकर्ते मोहन वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, कृष्णा माने, सुरज वाळुंज, जनार्दन होले, प्रकाश ओव्हाळ तसेच मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

6 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

8 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago