शिरूर (अरुणकुमार मोटे): तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर शिरूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताना सामाजिक भान ठेवून सत्काराला फाटा विशेष मुलांच्या संस्थेला मदत करण्यात आली आहे.
शिरूर पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून संभाजी बाबुराव कोळपे हे नियुक्तीस होते. शिरूर पंचायत समिती येथे नियुक्तीस असताना अनेकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले.शिरूर तालुक्यात सेवा बजावल्यानंतर सेवा समाप्ती च्या अखेरच्या दिवशी शिरूर शहरात विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस त्यांनी भेट देत मिळालेल्या मानधनाच्या रक्कमेचा धनादेश त्यांनी संस्थेच्या प्रमुख रानिताई चोरे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच या पुढील काळात ही मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय शिंदे, शिरूर ग्रामीण चे ग्रामविकास अधिकारी पी. सी.केदारी हे उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…