शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार असून ते १००% दिव्यांग (मूकबधिर) आहेत. सरकारी जमिनीवर त्यांनी आपले छोटेसे घर बांधले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे घर ‘अनधिकृत’ असल्याचे सांगून ते पाडण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. या अन्यायकारक कारवाईविरोधात पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्याच्या बाजूने अ‍ॅड. प्रतीक्षा ठुबे आणि अ‍ॅड. रूपिका नारकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने २० ऑगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय (G.R.) निर्गमित केला आहे. याचिकाकर्ता हा अत्यंत गरीब आणि पूर्णतः दिव्यांग असल्याने त्याचे घर या नियमांतर्गत सुरक्षित राहू शकते.

दरम्यान, या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. प्रतीक्षा ठुबे आणि अ‍ॅड. रूपिका नारकर यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे आणि प्रियंका चव्हाण यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने हे मुद्दे गांभीर्याने घेत खालील आदेश दिले:
तोडकामावर स्थगिती: पुढील आदेश येईपर्यंत याचिकाकर्त्याचे घर न पाडण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना: न्यायालयाने जिल्हाधिकारी, पुणे यांना तातडीने या आदेशाची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नोटीस जारी: न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून २०२६ रोजी निश्चित केली आहे.

महाविद्यालयीन शुल्कातील अनियमिततेची चौकशी; निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

सर्वोच्च न्यायालय! अल्पवयीन गर्भवतीवर बाळ जन्म देण्यास जबरदस्ती करू शकत नाही

शिरूर न्यायालयाचा निकाल; अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

2 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

5 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

8 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

16 तास ago