क्राईम

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी (डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर आता डीपी चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे.

वाघाळे येथे कॅनलवरील डीपी चोरीला…
वाघाळे येथील गट क्रमांक 100 मधील कॅनलवरील डीपी शुक्रवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली. सूर्यकांत बढे गुरुजी हे सकाळी शेतात जाण्यासाठी पायी निघाले असताना यांच्या निदर्शनास डीपीचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या घटनेप्रकरणी रांजणगाव कारेगाव पोलिस स्टेशन येथे एकनाथ डफळ व दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात व पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट…
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कसाबसा पिकांना पाणी देऊन त्यांचे संरक्षण करत आहेत. मात्र डीपी चोरीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महावितरणकडून तात्काळ डीपी देण्याची मागणी…
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरणने तात्काळ नवीन डीपी बसवावी, अशी मागणी केली आहे. “आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी,” अशी मागणी शामराव शेळके, रामदास गायकवाड, नवनाथ गावडे, सुरेश डफळ व सुधीर बढे यांनी केली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न…
शिरूर तालुक्यात वाढत्या डीपी चोरीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शेतकरी वीज यंत्रणांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

शिरूर परिसरात महावितरणच्या चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

शिरूर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago