शिरूर तालुका

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यातील करडे घाटातील हॉटेल मधील घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): करडे घाट (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये युवकांनी केलेल्या जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणातून एका महिलेसह ७ जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, संगीता युवराज गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

unique international school

करडे घाट (ता. शिरुर) येथे दोलाराम चौधरी यांचे राजस्थान ढाबा नावाने हॉटेल आहे, सहा जुलै रोजी काही युवक सदर हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेल मालक चौधरी यांनी सदर युवकांना जेवणाचे बिल मागितले. त्यामुळे सदर युवकांनी हॉटेल मालक व कामगारांना बरोबर वाद घातला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास एम एच २० ई वाय ०३४० या कार सह २ दुचाकींवर काही युवक आले. त्यांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ, दमदाटी करत आमच्याकडे जेवणाचे पैसे मागतो काय असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत दोलाराम भियाराम चौधरी (वय ३१) रा. करडे घाट (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, संगीता युवराज गायकवाड (पूर्ण नाव पत्ते माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago