Nathabhau Shewale
रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेशाध्यक्ष” पदी नुकतीच निवड करण्यात आली. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना बंगलोर येथील निवास्थानी निवडीचे पत्र दिले.
नाथाभाऊ शेवाळे हे गेले ३० वर्ष जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते असुन देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी जनता दलाचे शिरुर तालुका अध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष या पदांवर काम केलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ५ हजार प्रतिमहिना पेन्शन मिळावी यासाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासोबत कोल्हापूर ते नागपूर असा पायी प्रवास करत त्यांनी संघर्ष यात्रेत सहभाग घेतला होता. शेतकरी, बेरोजगार, कामगार, दलित, मुस्लीम, या वर्गाच्या न्याय व हक्कासाठी नाथाभाऊ यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. या निवडीबद्दल त्यांचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एडी.डी. कुमारस्वामी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार अँड. श्रीपतराव शिंदे, यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक वसाहत मधील कामगार हक्कासाठी लढा तसेच गोरगरीब जनतेसाठी शेवाळे यांनी अनेक कामे केली करोना काळात रुग्णवाहिका, बेरोजगार तरुणांना रोजगार, वृद्ध पेन्शन योजना, औद्योगिक वसाहतीमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांसाठी लढा उभा करत त्यांना न्याय मिळून देण्यासाठी नाथाभाऊ सतत प्रयत्न करत आहे. जनता दल पक्षाच्या पदाचा कारभार सांभाळत गोरगरीब जनतेसाठी नाथाभाऊ यांनी शिक्षणाची सोय करत कारेगाव येथे शाळा कॉलेज सुरु केले यामध्ये गरीब घरातील मुलांना अत्यंत मापक दारात त्यांनी शिक्षण देऊन हि शिक्षणाची ज्ञानगंगा सुरु ठेवली आहे.
आपल्या राजकीय कार्यकाळात २० टक्के राजकारण तर ८० टक्के समाजकारण करत समाजसेवेचा वसा नाथाभाऊ यांनी जपला आहे. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा प्रदेशाद्याक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास, पक्षनिष्ठा व पक्षाविषयी असलेले प्रेम याची मिळालेली हि पावती आहे असे सर्व कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. लवकरच आपण राज्यव्यापी दौरा करत राज्यात जनता दल पक्षाला नवसंजीवनी देत गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे यावेळी नाथाभाऊ शेवाळे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…