शिरूर तालुका

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय बेकायदेशीर सावकारीचा चांगलाच फास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून त्यातून सामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहानमोठे गुन्हे घडू लागल्याने सदर सावकारीवर आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गावांमध्ये काही ठिकाणी सावकारांनी नागरिकांना बेकायदेशीरपणे व्याजाने दिलेल्या पैशांसाठी नागरिकांच्या जमिनी, घरे, वाहने नावावर करुन घेतली आहेत, तर काही नागरिकांची जमीन व घरे परस्पर विक्री केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तसेच यापूर्वी सावकारांबाबतच्या काही तक्रारी थेट मंत्रालयात पोहोचल्याच्या घटना आहेत. बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत सावकारी करणाऱ्यांमध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश यापूर्वी उघड झालेला आहे.

सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावच्या सध्याच्या सरपंचाने नागरिकांचे कोरे मुद्रांक, कोरे चेक लिहून घेऊन अनेक बेकायदेशीर व्यवहार केल्याचे निदर्शनास आले तर एका गावातील बड्या व्यक्तीने व्याजाच्या पैशासाठी लहान व्यावसायिकाचे अपहरण केल्याचा प्रकार घडून त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. या आठवड्यात शिक्रापूर येथे एका हॉटेल व्यावसायिकाने एका सावकाराने व्याजाच्या पैशासाठी दमदाटी केल्याचे तर एका युवकाने व्याजाच्या पैशासाठी महिलेची जमीन नावावर करुन घेत महिलेची फसवणूक केल्याबाबतचे गुन्हे या आठवड्यात दाखल झालेले आहे.

सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीर सावकारांचे धंदे मोठ्या जोमाने सुरु असून त्यांच्या हुकुमशाही मुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असून नागरिकांच्या गळ्याला सावकारकीचा फास लागला असल्याने येथील सावकारांना आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सावकारांची दमबाजी व दडपशाही…

सावकार हे नागरिकांना पैशासाठी काहीही कर, जमीन विक, गाडी विक, बायकोचे दागिने विक, सालाने रहा, मात्र माझे पैसे दे, तू कोणाकडे गेला तरी काही फायदा होणार नाही, माझी खूप लांब ओळख आहे, माझे काही होणार नाही अशी धमकी देत नागरिकांना दमबाजी करत नागरिकांच्या काही वस्तू देखील जप्त करुन नागरिकांना दडपशाही करत आहे.

नागरिकांनी न घाबरता तक्रार द्यावी; हेमंत शेडगे 

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर सावकार नागरिकांना व व्यवसायिकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र सावकारांच्या दहशतमुळे नागरिक तक्रार देण्यास समोर येत नाहीत. मात्र नागरिकांनी न घाबरता बिनधास्तपणे तक्रार देण्यास पुढे यावे सावकारांना निच्छितच कायद्याचा बगडा दाखवला जाईल, असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

नागरिकांनी बिनधास्त तक्रार करावी; शंकर कुंभार

खाजगी सावकारांबाबत नागरिकांनी आमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यास आम्ही चौकशी करुन बेकायादेशीपणे काम करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करु, त्यामुळे नागरिकांनी व्यथित न होता, न घाबरता आमच्या कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन शिरुरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago