शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विदयालात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा व गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सन १९८४ ते २०२२ पर्यंतच्या इ.१० वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून सन्मानपत्र,शाल व गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले.आतापर्यंत या विद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.त्यातील बरेचसे विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील व उत्तम व्यावसायीक आणि प्रगतशील शेतकरी बनलेले आहेत. तब्बल ४० वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.सर्वजण वर्गातील व शाळेच्या जुन्या आठवणी काढत रमून गेले. यावेळी जवळपास १२० गुणवंत माजी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.
बबुशा उचाळे, रमेश गुगळे, डॉ. गणेश खामकर, मच्छिंद्र भाकरे, महेश गावडे, बाळासाहेब घोडे, संगिता गांधी, मिरा प्रभूणे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. तर सेवानिवृत्त प्राचार्य श्री.प्रभाकर खोमणे व प्राचार्य. आर. बी. गावडे सरांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास १२० गुणवंत माजी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले.
विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे यांना जीवनगौरव पुरस्कार व प्राचार्य आर. बी गावडे यांना महर्षी पुरस्कार अनिल गुंजाळ सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक/अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, माजी जि.प. सदस्या सुनिता गावडे, मुख्याध्यापक विलास घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, चांडोह वि.का.सो. अध्यक्ष बाळासाहेब सालकर, टाकळी हाजी सोसायटीचे माजी अध्यक्ष चांदा गावडे, चंद्रकांत साबळे, माजी सरपंच दिपक दुडे, पैलवान प्रशांत चोरे, शिवाजी महाराज कांदळकर, शिवाजी महाराज गावडे, धोंडीभाऊ जाधव, डॉ. प्रकाश उचाळे, पोपट हिलाळ, इ. ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे संभाजी साबळे सर, दत्तात्रय मुसळे, विजय थोरात, बाबाजी रासकर, धोंडीभाऊ गावडे, दत्तात्रय शिंदे, स्वप्निल गावडे, भरत घोडे, योगेश भाकरे, नितीन गावडे, अनिल पखाले, किरण भाईक, प्रतिक साबळे, शशिकला चोरे, कल्पना हिलाळ, अर्चना सोदक यांनी विशेष प्रयत्न केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी तर सुत्रसंचालन लहू साबळे यांनी केले. शशिकला चोरे हिने आभार मानले.
ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…