धामारीच्या नागरिकाची थेट जमाबंदी आयुक्तांकडे लेखी मागणी
शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याच्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने मोजणी करत भू माफियांच्या मदतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिरुर तालुक्यातील भूमी अभिलेख अधिकारी विनायक ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तेजस मोहिते यांनी जमाबंदी आयुक्तांकडे केली आहे.
धामारी (ता. शिरुर) येथे मोहिते कुटुंबियांची जमीन असून सदर जमिनीच्या क्षेत्रफळात तफावत असल्याने मोहिते यांनी भूमिअभिलेख उपसंचालक यांच्या अर्ज करत जमिनीच्या एकत्रीकरण योजना दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
त्यांनतर भूमी जिल्हा अधिक्षक यांनी सदर बाबतची चौकशी करुन अहवाल सदर करण्याचे आदेश शिरुर भूमी अभिलेख अधिकारी विनायक ठाकरे यांना दिले. त्यामुळे सदर बाबतची कार्यवाही सुरु असताना देखील भूमी अभिलेख अधिकारी ठाकरे यांनी एका व्यक्तीच्या नावाने मोजणी बाबतचा अर्ज प्राप्त करुन घेत जमीन मालक असलेल्या मोहिते कुटुंबियांच्या परस्पर सदर जमिनीची मोजणी केली.
तर मोहिते यांची जमीन भूमाफियांच्या माध्यमातून बळकावण्याच्या हेतूने शिरुर भूमी अभिलेख अधिकारी विनायक ठाकरे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत तेजस मोहिते यांनी जमाबंदी आयुक्तांकडे लेखी तक्रार करत विनायक ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत शिरुर भूमिअभिलेख अधिकारी विनायक ठाकरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता सदर तक्रारी मध्ये काही तथ्य नसून नियमानुसार सर्व कामकाज करण्यात आलेले असल्याचे शिरुर भूमीअभिलेख अधिकारी विनायक ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…