शिरूर तालुका

शिरुर मधील डॉक्टरांच्या शनिवार दि १७ रोजी वैद्यकीय सेवा बंद डॉ राहुलदत्त पाटील व डॉ स्वप्नील भालेराव यांची माहिती

शिरुर (अरुणकुमार मोटे) इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद मध्ये शिरुर मधील डॉक्टर सहभागी होवून बंद पाळणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिशन शिरुर चे अध्यक्ष डॉ राहुलदत्त पाटील तसेच सचिव डॉ स्वप्नील भालेराव यांनी दिली. या संदर्भात शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या घटनेत एका डॉक्टर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरच्या काळात या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे वागणूक देत तपासातही निष्काळजीपणा दाखविला.

 

तसेच स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि रुग्णालयातील विविध विभागांची तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. परंतु नियमित ओपीडी आणि तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी न्याय्य मागण्यांची पुर्तता करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यासह एपीआय रमेश कदम यांनी तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु

शिरुर तालुक्यातील सविंदणे गावचे अरुणकुमार मोटे ‘निर्भीड पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago