शिरूर तालुका

माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत: एकनाथ खडसे

शिक्रापूरच्या माऊलीनाथ हॉस्पिटलला एकनाथ खडसेंची भेट

शिक्रापूर: डॉक्टर त्यांच्या कार्यातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे मोलाचे काम करत असतात. शिक्रापूर येथील माऊली नाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सेवेसह अनेक समाजपयोगी कार्ये केले जात असल्याची बाब कौतुकास्पद असून माऊलीनाथ हॉस्पिटलचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील माऊलीनाथ हॉस्पिटल येथे राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूलमंत्री विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतीच भेट दिली, माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. दिपक पाटील, डॉ. मंजिरी सोनवणे, डॉ. सायली तापकीर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर थेऊरकर, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, उद्योजक प्रशांत सासवडे, साईराम सातव यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माऊलीनाथ हॉस्पिटल हे त्यांच्या टीमच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना अनेक समाजपयोगी कामे देखील केली जात आहे, ग्रामीण भागातील महत्वाची असलेली सर्व सुविधा सध्या येथे उपलब्ध करण्यात आल्याची बाब निच्छितच चांगली आहे. यापूर्वी कोरोना काळामध्ये अनेक नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना देखील येथे मृत्युच्या धाडेतून बाहेर काढण्यात आले तर एका युवतीच्या पोटामध्ये गेलेली सुई डॉ. पवन सोनवणे व डॉ. अजिंक्य तापकीर यांनी बाहेर काढून राज्यात आपल्या सेवेचा ठसा उमटविला असल्याचे सांगत माऊलीनाथ हॉस्पिटलच्या टीमचे एकनाथ खडसे यांनी कौतुक केले. यावेळी माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago