शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय अर्जुन जाधव या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास असलेल्या महिलेच्या अल्पवयीन युवतीची ओळख विजय जाधव या युवकासोबत झाली. त्यानंतर त्याने सदर युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले. मात्र सध्या युवतीला भेटण्यास टाळाटाळ करु लागला. मात्र युवतीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितल्याने युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी विजय अर्जुन जाधव (वय २३) रा. सिद्धिविनायक हॉटेल जवळ मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध बलात्कार सह बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल करत विजय जाधव याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस शिपाई रोहिदास पारखे हे करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…