शिरूर तालुका

शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेत गैरव्यवहार

शालेय व्यवस्थापन समितीकडूनच पंचायत समितीकडे तक्रार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक मिळवलेला तसेच आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत सदर शाळेचा उल्लेख केलेली शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता पहिलीतील तीनशे हून अधिक तर इतर वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तीन ते पाच हजार रुपये प्रवेश फी म्हणून घेत मुख्याध्यापकांवर दहशत करणाऱ्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या तीन सदस्यांवर कारवाई करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या तेरा सदस्यांनी शिरुर पंचायत समितीकडे तक्रार केली असून कारवाई करत गुन्हे दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे व सदस्य रवींद्र पाटील व अतुल ताजणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शाळेवर आपला कब्जा मिळवून मुख्याध्यापकांवर दहशत सुरू करत मुख्याध्यापकांचा पदभार सोयिस्कर एका शिक्षकाकडे द्यायला लावून, शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीशिवाय जमा रकमेची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार काही वर्षांपासून शाळेत होत असून या घोटाळ्यात सहभागी होण्यासाठी देखील एका मुख्याधापकांवर दहशत केली जात असल्याचे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर शाळेत प्रवेशासाठी सक्तीने तीन ते पाच हजारांच्या देणग्या गोळा करुन त्याचा हिशोब शाळा व्यवस्थापन समितीला दिला जात नसल्याने तेरा सदस्यांनी सदर प्रकरण बाहेर काढले आहे.

सदर घोटाळ्यात अध्यक्ष व दोन सदस्यांचा हा घोटाळा असून तिघांमुळे शाळा तर बदनाम होत असताना आठ ते दहा लाखांची अफरातफर करुन २८४ विद्यार्थ्यांना शाळा गणवेश न वाटता त्याचे पैसे गणवेश पूरवठादाराला परस्पर दिल्याचीही तक्रार शालेय व्यवस्थापन समितीच्या तेरा सदस्यांनी केल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी दिली आहे. तर याबाबत बोलताना शाळेबाबत आम्ही तक्रार केल्याने चौकशी समिती नेमली गेली, काही पालकांनी स्वच्छेने शाळेला देणगी दिली, ती रक्कम शाळेच्या बँक खात्यात भरुन देणी चेकद्वारे दिली, या निर्णयामध्ये तक्रार दार सदस्य सहभागी असून तक्रार दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शाळेत राजकीय कुरखोडी सुरु असल्याचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे यांनी सांगितले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील आर्थिक अफरातफरी बाबत तक्रार आली असून त्यावर विस्ताराधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनाकडून अर्जाची छाननी तसेच माहिती संकलन सुरु केली असून तक्रार दारांच्या अर्जातील माहिती नुसार पुढील कार्यवाही व चौकशी होईल असे शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी सांगितले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील घटनेबाबत जिल्हा परिषदेकडून नेमलेल्या चौकशी समितीकडून चौकशी सुरू असल्याने याबाबत मला अधिक बोलता येणार नसल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक अशोक बगाटे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago