शिरूर तालुका

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारलेली असताना संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुखई संघाने २४ – २ होमने व एक डाव राखून सामना जिंकला असून यामध्ये संघनायक सिद्धी गावडे, श्रेया इंगळे, प्रज्ञा मलगुंडे, अंजली राठोड, श्रद्धा गावडे, नीता घोडे, गीता पारकर, समीक्षा मेचे, स्मृती सांगळे, अश्विनी नागरे, प्रतीक्षा काळे, सिद्धी झुरंगे, आर्या शिरसाट, सानिष्का दोरगे यांनी सहभाग घेत विशेष कामगिरी केली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक मनोज धिवार, रेखा काळे, महेश शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य तुकाराम शिरसाट, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे व संस्थेचे कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे यांनी अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

21 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago