शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीन मधून मशीनची छेडछाड करुन एटीएम मशीन मधून तब्बल 90 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंप समोर शरद बँक असून बँकेच्या शेजारीच ATM मशीन आहे. बँकेचे व्यवस्थापक तेरा मार्च रोजी मशीन मधील रकमेची तपासणी करत नोंद करुन घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी मशीन मधील रकमेचा तपशील तपासाला असता त्यांना 90 हजार रुपये कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता शरद बँकेच्या एटीएम सेंटरचा दरवाजा उघडा १३ मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ATM मध्ये प्रवेश करुन कशाच्यातरी सहाय्याने मशीनची छेडछाड करुन मशीन मधील तब्बल 90 हजार रुपये चोरुन नेल्याचे समोर आले
सदर घडलेल्या प्रकाराबाबत अनिल किसन आदक (वय ४१) रा. लोणी धामणी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…