शिरूर तालुका

जिल्ह्यात मेरिट मध्ये आल्याने पूर्वा खुडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरुर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करत पुढील उज्वल वाटचालीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यंदा राज्यातून इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ४ लाख १८ हजार ५५ विद्यार्थ्यांनी आणि इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ३ हजार ८१९ अशा एकूण ७ लाख २१ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यापैकी ६ लाख ६२ हजार १६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. यापैकी इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी चे एकूण १ लाख २६ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन त्यातील २९ हजार १७१ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य मेरिट मध्ये येणाऱ्या शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण विभागाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विभागातील शिरुर तालुक्यातील विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे खूप कौतुक होत आहे.

शिरुर तालुक्यात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) एकूण २२४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असुन, यात विशेष बाब म्हणजे राज्य मेरिटमध्ये आलेले सर्व पाच विद्यार्थी हे ग्रामीण विभागातील आहेत. पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) एकूण ३७४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असुन, राज्यमेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण विभागातील ६ विद्यार्थी व शहरी विभागातील २९ विद्यार्थी आहेत.

शिरुर तालुक्यातील मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी व सध्या रयतच्या शिरुर शाखेत शिक्षण घेत असलेली कु. पुर्वा रवींद्र खुडे या विद्यार्थिनीने जिल्हा मेरिट मध्ये स्थान पटकावलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शाळा सिद्धी मुल्यमापन २०२२-२३ अंतर्गत, शिरुर येथे नुकतेच यासाठी शाळा तपासणी पथक आलेले होते. त्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

या पथकाचे अध्यक्ष आणि शिरुरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते. तर यात पथक प्रमुख म्हणून मोरगाव शाखेचे प्राचार्य के एच गिरमकर, तर पथकातील सदस्य आर बी गोळे, एस व्ही सादरे, आर के बांदल, पी के आटोळे, एच पी बालगुडे, पी बी खामगळ, एल जे पालसांडे, पी टी आडमुठे, जी व्ही बोरकर, तसेच शिरूर शाखेचे प्राचार्य राजेंद्र देशपांडे, उपमुख्याध्यापक मनोहर काळे, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे, एम सी व्ही सी विभागप्रमुख एस व्ही भोसले, वाणिज्य विभागप्रमुख जे एस कडेकर, टेक्निकल विभागप्रमुख एम एस माने या मान्यवरांच्या हस्ते कु. पुर्वा खुडे हीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यू इंग्लिश स्कूल, शिरुर येथील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कु पुर्वा ही पत्रकार रवींद्र खुडे, तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ भारती रवींद्र खुडे (चांदणे) यांची कन्या आहे. कु. पुर्वा च्या यशाबद्दल तिला शिक्षण, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच नातलग व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

7 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago