३.७५ लाखांचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसर तसेच आठवडे बाजार आणि प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याबाबत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सूचना दिल्यानंतर तपास पथकाने विशेष मोहीम राबवून उल्लेखनीय यश मिळवले.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी मोबाईल ट्रेसिंगद्वारे हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरु केले. अनेक नागरिक हरवलेला मोबाईल परत मिळण्याची आशा सोडून देतात. मात्र सन २०२५ पासून आतापर्यंत हरवलेल्या मोबाईलपैकी तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन शोधून काढण्यात रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले.आज (दि ४ जुलै) रोजी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी रांजणगाव MIDC पोलिसांचे आभार मानत, पोलिसांकडून आम्हाला “सरप्राईज गिफ्ट” मिळाले अशी भावना व्यक्त केली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पुण्याचे पोलीस अधीक्षक शुभम कुमार, , उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग (अतिरिक्त कार्यभार शिरूर उपविभाग) अमोल मांडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.हि मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरु असून, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची…
मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड…
मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले…
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या…
मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड…
मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा…