महाराष्ट्र

सभागृहातील वक्तव्ये आणि जनतेच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचा अभाव चिंताजनक

मुंबई : एका सभागृहात “भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, फक्त परसेंटेज कमी असावं,” अशा स्वरूपाची वक्तव्ये झाल्याची चर्चा असताना, दुसरीकडे चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू आणि साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूसारख्या गंभीर घटनांवरही राजकीय टोलेबाजी आणि हशा झाल्याने लोकशाहीतील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या दोन्ही घटनांमध्ये प्रशासनाने वेळेत आणि प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर संबंधितांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना व्यक्त होत आहे.

हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून, भ्रष्टाचाराकडे गांभीर्याने न पाहता तो “किती टक्के?” या निकषावर मोजण्याची मानसिकता आणि जनतेच्या दुःखावरही राजकारण करण्याच्या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, सभागृहाचे पावित्र्य केवळ विरोधक किंवा सत्ताधारी यांच्यामुळे कमी होत नाही; तर सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या वागण्या-बोलण्यात संयम, जबाबदारी आणि संवेदनशीलता राखणे आवश्यक आहे.

यामुळे मतदारांनी पक्षापेक्षा मूल्य जपणारे, जबाबदारी स्वीकारणारे आणि जनतेच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व निवडण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सभागृहात सत्तेपेक्षा जनतेच्या विश्वासाचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago