४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि सजगतेने काम करत तांत्रिक विश्लेषण, बातमीदारांची मदत व सखोल तपासाच्या माध्यमातून ही कामगिरी पार पाडली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी हे मिशन पूर्ण केले. याच कालावधीत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून ४५ महिला व ३५ पुरुष बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.
सदर प्रकरणांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या आदेशानुसार एक विशेष मिसिंग शोध पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस हवालदार संपत खबाले, अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे आणि महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांचा समावेश होता. या पथकाने एक महिन्याच्या कालावधीत कसून शोधमोहीम राबवून सर्व ८० नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले. या संपूर्ण यशस्वी मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पो.उपनिरीक्षक: शुभम चव्हाण पो.हवालदार: नाथसाहेब जगताप, संपत खबालेपो.अंमलदार: विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, महिला अंमलदार: भाग्यश्री जाधव, मोनीका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीन पप्पुवाले, गीता सुळे, सारिका माळी शिरूर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता, दक्षता आणि मानवी मूल्यांशी बांधिलकी हे समाजासाठी एक आदर्श ठरणारे आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच नागरिकांच्या पुनश्च संपर्कासाठी शिरूर पोलीस ठाण्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…