सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि पोटावरील फॅट्स कमी होतात. या अभ्यासात सहभाग घेतलेल्या लोकांनी मेडिटेरेनियन आहार घेतला. हा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
सर्व उपवास करणाऱ्या गटांमध्ये वेळ ठरवून उपवास न केल्याने वजन कमी होते म्हणजेच सरासरी ३-४ किलो वजन कमी होते. पण, जे सायंकाळी ५.३० पर्यंत जेवण करतात आणि सकाळी १० वाजता जेवण करतात. त्यांच्या पोटावरील फॅट्स कमी झाले आणि शरीरातील ग्लुकोजच्या पातळीत सुधारणा झाली आहे.
दिवस संपायच्या आधी तुम्ही जेवण करीत असाल, तर ते रक्तातील साखर आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० दरम्यान तुम्ही जेवण करीत असाल, तर ‘या’ विशिष्ट आठ तासांचा तुमच्या वैयक्तिक जीवनशैलीवर परिणाम दिसून येतो.
रक्तातील साखर आणि पोटावरील फॅट्स कमी करण्यासाठी १६:८ दिनचर्या सर्वांत प्रभावी का ठरते
दिवसभर आठ तासांदरम्यान खाल्यानंतर १६:८ पद्धत पोटावरील फॅट्स कमी करण्यासाठी आणि ग्लुकोज नियंत्रणासाठी प्रभावी ठरते. कारण- यामुळे दीर्घ उपवास करता येतो. उपवासादरम्यान शरीर नैसर्गिकरीत्या इन्सुलिनचे उत्पादन कमी करते, जे खाण्याच्या कालावधीत प्रभावीपणे इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारू शकते.
त्यामुळे हे इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारते आणि शेवटी रक्तातील साखरेच्या पातळीत सुधारणा दिसून येते. कमी इन्सुलिनसह शरीरात साठवलेल्या ग्लुकोजचा उपयोग होतो; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि कॅलरी नियंत्रित करण्यात मदत होते. उपवासादरम्यान शरीर नैसर्गिकरीत्या कमी कॅलरीज वापरते, जे वजन नियंत्रणात फायदेशीर ठरू शकते.
जेवणाची वेळ महत्त्वाची आहे का
जेवणाची वेळ महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. खाण्याची वेळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. ही वेळ आठ तासांपर्यंत मर्यादित करून, तुम्ही कमी कॅलरीज वापरू शकता. इन्सुलिनची पातळी कमी होत असताना, शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्सचा उपयोग करते; ज्यामुळे पोटाभोवती असलेले फॅट्स कमी होतात. काहीही न खाल्यामुळे भुकेसाठी ओळखले जाणारे घ्रेलिन हार्मोन आणि लेप्टिन हार्मोन्सचे कार्य सुधारते; ज्यामुळे भूक लागत नाही. ठरावीक वेळेत आहार घेतल्याने वजन कमी करण्याच्या इतर पद्धतींच्या तुलनेत कमी कालावधीत फायदे दिसून येते; पण दीर्घकालीन फायदे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…