शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील तसेच परिसरातील नागरिकांना २०० झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, उर्वरित वर्गणीचा उपयोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या झाडांसाठी शिरुर रोटरी क्लबचे तालुकाध्यक्ष संजय तांबे यांनी विशेष सहकार्य केले. गेल्या १८ वर्षांपासून शंभुराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय वस्तूंचे वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यांचा समावेश आहे.
यावेळी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच विकास मासळकर, सरपंच पुनम काशिद, उपसरपंच अतिश निकाळजे, महेश मासळकर, चेअरमन गणेश मासळकर, समीर खंडाळे, गुलाब रणपिसे, विजय खैरे, दादा चव्हाण, प्रदीप खंडाळे, भूषण घोलप, प्रशांत मासळकर, राम नवगिरे, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोम शिंदे, मोहन घोलप, तन्मय मासळकर, जकिर मुलाणी, वेदांत मासळकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनास हातभार लागला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…