राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; शिरूर तालुक्याचा अभिमान
शिरूर (अरुणकुमार मोटे): नेवासा फाटा, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या समृद्धी अजय चव्हाण हिने थक्क करणारी कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी तब्बल ३९८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिने नागपूर येथे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी पात्रता मिळवली असून, शिरूर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.
अतिशय कमी कालावधीत उल्लेखनीय यश मिळवत समृद्धीने नेमबाजी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ दीड वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिने भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेपर्यंत मजल मारली, ही तिच्या जिद्दीची आणि निष्ठेची साक्ष देणारी बाब आहे.
याआधी तिने उत्तराखंड, भोपाळ, दिल्ली, केरळ आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चाचणी, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, तिची कामगिरी सातत्याने उजवी ठरली आहे.
समृद्धीला शिरूर येथील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक शरद तरटे यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन लाभत आहे. तसेच तिच्या आई-वडिलांचा आणि कुटुंबीयांचा प्रोत्साहनपर पाठिंबा हे तिच्या यशामागील प्रमुख बळ मानले जाते.
समृद्धीच्या या यशाबद्दल शिरूर तालुका तसेच कळवंतवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
“समृद्धीने मेहनतीच्या जोरावर नेमबाजी क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग झेप घेतली आहे. तिच्याकडून भविष्यात भारतीय संघात प्रतिनिधित्वाची अपेक्षा आहे,”असे प्रशिक्षक शरद तरटे यांनी सांगितले.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…