शिरूर तालुका

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले असुन सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच पत्रकार अमोल बोरगे यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

अपघातानंतर मोफत उपचाराऐवजी थेट बिल…

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील सयाजी तबाजी आडगळे तसेच त्यांच्या पत्नी सारीका सयाजी आडगळे यांना शुक्रवार, दि १९ डिसेंबर २०२५ रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सयाजी आडगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने १९ टाके घालावे लागले. जखमींना शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, आयुष्यमान कार्ड असुनही “कार्ड चालत नाही”, “या कार्डवर उपचार होत नाहीत” असे सांगत मोफत उपचार नाकारण्यात आले. याउलट दोन्ही रुग्णांचे मिळुन सुमारे ७० हजार रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही रक्कम रोख स्वरुपात वसुल केल्याचाही गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

अनुसूचित जातीतील मोलमजुर कुटुंबाची पिळवणूक

सदर अपघातग्रस्त कुटुंब हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे व अनुसूचित जातीतील आहे. शासनाच्या अपघात व आरोग्य योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना, रुग्णालयाने शासकीय धोरणांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

औषधांच्या दरात लूट; बिलात तफावत

सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर बिलामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले. रुग्णालयातील मेडिकलमधील औषधांचे दर बाहेरील मेडिकलपेक्षा अनेक पटींनी जास्त असल्याचेही स्पष्ट झाले.

प्रशासकाकडुन अरेरावी, पोलिसांना पाचारण

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांनी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच पत्रकार अमोल बोरगे यांच्याशी अरेरावीची भाषा व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. मात्र, औषधांचे वाढीव दर व रुग्ण शासकीय योजनेस पात्र असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला कर्मचारी व रुग्णांसमोर माफी मागावी लागली, अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.

५० हजार रुपये वाचले; आंदोलनाचा इशारा

या संघर्षामुळे अडगळे कुटुंबाचे तब्बल ५० हजार रुपये वाचले असून, संबंधित कुटुंबाने भारतीय बहुजन पालक संघाचे आभार मानले आहेत.

दरम्यान,

दोषी रुग्णालयावर कठोर कारवाई

रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत मिळवून देणेगरज भासल्यास रुग्णालयाची शासकीय मान्यता रद्द करणे

रुग्णालयाच्या दर्शनी भागात मोफत उपचारांची यादी व दर मराठीत लावणे

अशा ठाम मागण्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत.

गरीबांची लूट सहन करणार नाही – बहुजन पालक संघ

सरकारी जागेवर चालणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाने गरीब, गरजू व अपघातग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट केल्यास कठोर आंदोलन व कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा भारतीय बहुजन पालक संघाने दिला आहे. या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago