शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरुन कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांच्याकडे दिला असताना त्यांनी सदर अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही तसेच तक्रारदार यांच्याकडे पैशाची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी पैसे मागितल्याबाबतची ऑडीओ क्लिपसह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार केली होती, त्याबाबत ची चौकशी केल्यानंतर पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांनी संबंधित अर्ज चौकशी कामी संशयास्पद वर्तन करुन आर्थिक लाभाच्या प्राप्तीच्या हेतुने कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय अर्ज चौकशी प्रलंबित ठेवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आल्याने चमनशेख यांनी पैशाची मागणी करुन शासकिय सेवकास अशोभनीय, असे गैरवर्तन करुन महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले तसेच शासकिय सेवेत दाखवलेल्या बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस खात्याला अशोभनीय अश्या वर्तनाबद्दल त्यांचेविरूध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन सेवेतुन निलंबित केल्याबाबतचे पत्रक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहे. तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडे नियमानुसार सकाळ व संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळी हजेरी लावणे देखील बंधनकारक असल्याचे देखील सदर पत्रकात म्हटले आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…