क्राईम

मुले पळविण्याच्या अफवातून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर सर्रासपणे पसरविण्यात येत आहे. या अफवामुळे निरपराध व्यक्तीला मारहाण करीत कायदा हातात घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अधीक्षक कलवानिया म्हणाले, अनोळखी महिला, पुरुष, भिकारीसह इतर कोणतीही व्यक्तीची खातरजमा न करताच केवळ वेशभुषा, हालचालीवरुन मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन जमाव मारहाण करतात. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. या प्रकारच्या तीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत.

भोकरदन ते जालना रस्त्यावर सखाराम जाधव यांच्या दुचाकीला कारचालकाने धडक दिली. यात जाधव यांचा नातु दिपक झरे हा गाडीच्या बोनटवर आदळला. त्यास चालकाने आठ किलोमिटरपर्यंत सिल्लोडच्या दिशेने नेले. मुलाच्या ओरडण्यामुळे नागरिकांनी मुले चोरणारी टाळी असल्याच्या संशयावरुन पाठलाग केला. ८०० ते १००० हजार लोकांच्या जमावाने कारची तोडफोड केली. त्यातील पवन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड) याच्यासह एकाला बेदम मारहाण केली. सिल्लोड पोलिसांनी जखमीची जमावाच्या तावडीतुन सुटका केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

14 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

14 तास ago