शिरूर तालुका

शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर-पाबळ भीमाशंकर रस्ता राज्यमार्ग १०३ यावरील कोंढाण-ओढा पुलावरील झालेली निकृष्ट कामे आणि आमदाबाद ते मलठण पर्यंत झालेले डांबरी रस्त्याचे निकृष्ट कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. याचीच दखल घेत, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग ,पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सदर तक्रार अनुषंगाने तात्काळ चौकशीचे सुचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

 

त्याच अनुषंगाने शिरुर उपविभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोंढाण-ओढ्यावरील कामाची पाहणी करुन सध्या पावसाळा असल्याने सदर कामाची तात्कळ खड्डे भरणे भराव दुरुस्तीची कामे सुरु केली असुन पुढे पावसाचे वातावरण उघडल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान रस्त्याचे काम कारपेटसह नव्याने करण्यात येणार असल्याची तसेच सदर खराब कामांबाबत अहवालही वरीष्ठ कार्यालयास लवकरच पाठवण्यात येतील अशी माहिती शिरुर उपविभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अनिल जाधव यांनी दिली आहे.

 

आंबेगाव विभागाच्या कार्यक्षेत्रात येणारा रस्ता आमदाबाद ते मलठण या कामाचीही संबंधित विभागाकडील अधिकारी सुर्यकांत कुंभार यांच्याकडुन पाहणी करण्यात आली असुन सदर काम मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेले असुन अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष कामाची पाहणी करुन वाळुंज यांनी या कामातील निकृष्ट बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. संबंधित रस्त्यावर सध्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असुन पावसाळा संपल्यानंतर आमदाबाद येथील गोडबोले वस्तीजवळील रस्ता ते आमदाबाद फाटा चौक, हाॅटेल देवकीनंदन मिसळ समोरील ते मयुरेश्वर माॅलपर्यंत, हाॅटेल विश्वपॅलेस ते मलठण ओढ्यापर्यंत आणि ओढ्यापुढील काम ते मलठण शाळे नजीक रोहित्र (डीपी) पर्यंत. या लांबीतील कामे खराब झाल्याने ही कामे नव्याने दुरूस्ती करून नवीन बीसी (BC) सिलकोटसह करण्यात येतील असे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अभियंता सुर्यकांत कुंभार यांच्याकडून तक्रारदार वाळुंज यांना सांगण्यात आले आहे.

 

तसेच वाळुंज यांनी सदरचे काम खुप मोठ्या प्रमाणात खराब झाले असल्याने संपुर्ण कामच पुन्हा नव्याने करुन देण्याबाबत तसेच पुढील कारवाईस्तव योग्य अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा. निकृष्ट कामे करणारे ठेकेदार काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम, पुणे विभागातील वरीष्ठांनी कार्यालयातून बाहेर येवुन अशा कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन अशा दर्जाहिन कामांबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे, अशी मागणी आंबेगाव सावर्जनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुर्यकांत कुंभार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

सदर कामाबाबत संपूर्ण रस्त्यावर फिरून पाहणी करण्यात आली, यावेळी मळगंगा उद्योग समूहाचे अशोक माशेरे उपस्थित होते .माशेरे यांनी सांगीतले की देखरेखीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असतानाही रस्त्याचे येवढे निकृष्ट काम होतेच कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

रस्त्याच्या कामांचा निकृष्ट दर्जा समोर दिसतच आहे. संबंधित विभाग हे त्यांच्या आश्वासनांची पुर्ती करतील आणी झालेली निकृष्ट कामे नव्याने करून देतील असे अपेक्षित आहे. अन्यथा या निकृष्ट कामांविरोधात जनहितास्तव जनआंदोलन करावे लागेल. कारण निकृष्ट कामे हि या देशाला लागलेली कीड आहे यातुन प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. राष्ट्रीय संपत्तीची लुट होत आहे. यामुळेच निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत अशी कामे करुन शासनाची व जनतेची फसवणुक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होण पुढील काळात अपेक्षित आहे. दोनही कामांची निःपक्ष चौकशी होऊन संबंधित ठेकेदार हे काळ्या यादीत टाकण्यात यावेत आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणे राष्ट्रहितास्तव आवश्यक आहे. याबाबत आवाज उठवल्यानंतर आमदाबाद ग्रामपंचायतनेही याबाबत पाठिंबा दर्शवला. तसे पत्रही पुणे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहे. याबाबत मी आमदाबाद ग्रामपंचायत आणि सरपंच सोनाली थोरात यांचे आभार व्यक्त करतो.

निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते) 

शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

14 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago