body

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर ३० ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव, ता. शिरूर जि. पुणे ) हे बुधवारी (ता.०५) रोजी नदीकाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अनोळखी पुरूषाचा मृतदेह नदीकाठी पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अनोळखी पुरूषाला पाण्यातून बाहेर काढत शिरूर येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका-यांनी सदर अनोळखी व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, याबाबत माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव ता.शिरूर जि. पुणे ) यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नारायण गवळी करत आहे.

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली