राजकीय

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

पुणे: मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (शुक्रवार) जोरदार बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिरूर-लोकसभा मतदार संघामध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.

भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा गोंधळ झाला आहे. शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दिलीप वळसे पाटील यांच्या समोर हा गदारोळ झाला.

भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत बसण्याच्या मुद्द्यावरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे समर्थक एकमेकांत भिडताना दिसले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्याने सभेत गदारोळ झाला. काहींनी खुर्च्या ही नाचवल्या. वळसे पाटील यांच्या समोरच हा गोंधळ झाला. वळसे पाटील यांनी विनवणी केल्यानंतर ही कार्यकर्त्यांचा गदारोळ सुरुचं होता, शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर वातावरण निवळले आणि वार्षिक सर्व साधारण सभा सुरू झाली. दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केले. मात्र, कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना मंचावर येण्यापासून रोखले. अजित पवार गटाने सर्व साधारण सभेत गुंड आणून आम्हाला रोखले, असा आरोप शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांनी केला आहे. देवदत्त निकम यांना बाहेर काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

2 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

2 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

7 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

7 तास ago