शिरूर तालुका

शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट; चिमुकल्यावर हल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. शिरूर येथील गुजर मळा परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आयुष भास्कर हरिहर (वय ४) हा बालक गंभीर जखमी झाला आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा घरासमोरील प्रांगणात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घाबरून पळत असताना खाली पडल्यावर कुत्र्यांनी त्याच्या डोक्याचा चावा घेतला. छातीला, हातालाही कुत्र्यांचे दात व नखे लागली आहेत. आयुष याने केलेल्या आरडाओरड्यामुळे काही नागरिक घटनास्थळी धावले व त्यांनी कुत्र्यांना हुसकावले. त्यामुळे त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग केव्हा येणार? माणसं मरण्याची तर शिरूर न. प .चे प्रशासन वाट पाहत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. गेली अनेक वर्षांपासून शहरातील विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, कार्यकर्ते शहरातील मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट त्यांच्यापासून होणारा त्रास यावर पत्र व्यवहार, प्रसंगी आंदोलन देखील झाली. परंतु निर्ढावलेल्या विभागाला काही जाग येत नाही कागदी घोडे, इतर कारणे सांगून गप्प आहे.

काही दिवसांपूर्वीच हैंद्राबाद येथील एका लहान मुलाचा मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा पाहिले. गुजर मळा येथे तशीच घटना घडली परिसरातील ४/५ भटक्या कुत्र्यांनी आयुष भास्कर हरिहर याला घेरले व हल्ला केला आणि लचके तोडले. सुदैवाने आयुषच्या आरडाओरड्या मुळे नागरिक धावले त्याची सुटका झाली. काही वेळ गेला असता तर दुर्दैवी घटना घडली असती.

दरम्यान, या घटनेची वेळीच दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नगर परीषदेने न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महिबुब सय्यद, अविनाश घोगरे यांनी दिला आहे.

शिरुर तालुक्यात कुत्रा चावल्याने लहान मुलाचा दुर्देवी मृत्यु 

शिरूर तालुक्यात जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्याने महिला गंभीर जखमी; गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिरुर तालुक्यात युवकाच्या दक्षतेमुळे कुत्र्याच्या तावडीतून कासवाला जीवदान…

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

1 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

3 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

3 दिवस ago