शिरुर तालुक्यात कुत्रा चावल्याने लहान मुलाचा दुर्देवी मृत्यु 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील जोशीवाडी येथील महादेवनगर येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव (वय ८) या विद्यार्थ्याला कुत्राने चावा घेतल्याने ऊपचारादरम्यान तो मृत्युमुखी पडला आहे. त्यामुळे शिरूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे)मा. शहरप्रमुख सुनिल जाधव, अविनाश घोगरे यांनी केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पवनला कुत्रा चावल्याने तो अस्वस्थ झाला होता. उपचारासाठी पुणे येथील नायडु दवाखान्यात त्याला नेण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यामान त्याचे सोमवारी ३ एप्रिलला निधन झाले. पवन याला काही दिवसापुर्वी कुत्र्याने चावा घेतला होता व तो शहरातील आरएमडी प्रशालेत इयत्ता दुसरीत शिकत होता. पवन हा शहरातील प्रसिध्द डॉ . कै. आर.डी. यादव यांच्या नातू होता .पवन यांच्या अकस्मित निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यत शोकाकूल वातावरणात पवन यांचा अंत्यविधी शिरुर येथे झाला.

दरम्यान मागील काही वर्षा पासुन शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्या बरोबरच त्याचे निर्बिजीकरण करणे, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करुन ही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरीक नाराजी व्यक्त करीत आहे. पवन यांच्या मृत्यु कुत्राने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परीसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुत्र्याने अथवा मांजराने चावा घेतला अथवा ओरखडल्यानंतर तातडीने या संदर्भातील रेबीज प्रतिबंधक लस तातडीने घ्यावी. लस घेण्याबाबत चाल ढकल पणा करु नये. सरकारी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध असते असे डॉ घावटे यांनी सांगितले त्याच बरोबर शिरुर शहरात वाढत असलेल्या मोकाट कुत्राच्या वावरा बद्दल चिंता व्यक्त करुन यावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणीही केली.

डॉ. ज्योती मुळे, शिरूर