Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्याने महिला गंभीर जखमी; गुन्हा दाखल…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): मोटारसायकलच्या पाठीमागे जाणीवपुर्वक कुत्रा सोडल्यानंतर तो चावल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबळे (ता. शिरूर) येथील सुनीता सर्जेराव बेंद्रे या रस्त्याने जात होत्या. यावेळी आरोपी विलास नारायण बेंद्रे याने जाणीवपुर्वक मोटारसायकलच्या पाठीमागे कुत्रा सोडल्याने व कुत्र्याने चावा घेऊन सदर महिलेला गंभीर जखमी केले. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कुत्र्याचा मालक नारायण बेंद्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २२ रोजी सकाळी ६.३० वा सुमारास मौजे आंबळे (ता. शिरुर, जि. पुणे) गावचे हद्दीतील निमोणे रोडला विलास नारायण बेंद्रे यांच्या घरासमोरील रोडवरुन शेतात फिर्यादी व तिचे पती सर्जेराव गुलाबराव बेंद्रे यांच्यासह मोटार सायकलवरुन जात होते. यावेळी आरोपी विलास नारायण बेंद्रे याने त्याचा पाळीव कुत्रा हा जाणीवपुर्वक त्यांच्या मोटार सायकलच्या पाठीमागे सोडल्याने त्या कुत्र्याने फिर्यादीची साडी दाताने ओढून गाडीवरून खाली ओढून हाताला व तोंडाच्या हनवटीला चावा घेवून जखमी केले. त्यामुळे तोंडाला पायाला हाताला मार लागला असून डाव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला आहे. याबाबत तक्रार दाखल केली असून, पुढील तपास तपासी अंमलदार स.फौ.चव्हाण हे करत आहेत.