शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथे आज (गुरुवार) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणेश बबन गावडे यांच्या शेतात असलेल्या वीज खांबावर अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
शेतामध्ये काम करत असलेल्या सुनील गावडे यांनी धुराचे लोट दिसताच तत्काळ गावकऱ्यांना फोन करून घटनास्थळी जमा केले. मात्र त्या वेळेस वारा प्रचंड असल्याने ज्वाळा क्षणाक्षणाला वाढत होत्या. ग्रामस्थांनी प्रयत्न केले तरी आग इतक्या वेगाने पसरत असल्याने कोणीही तिच्यावर नियंत्रण मिळवू शकले नाही. अखेर दोन एकरांतील सर्व ऊस जळून खाक झाला.
दरम्यान, या भागात वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित वीजखांबाचा पोल तातडीने सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात यावा, अशी मागणी भरत थोरात, सूर्यकांत बढे, नवनाथ थोरात आणि गणेश गावडे यांनी केली आहे. तसेच नुकसान झालेल्या उसासाठी तातडीने तोड मिळावी, अशीही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
View this post on Instagram
वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड
वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी
शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप