शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथील बबनराव लवांडे यांचे निधन

शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.

ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. लवांडे हे आपल्या शांत स्वभाव आणि प्रामाणिक सेवाभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेतकरी कल्याण, धार्मिक उपक्रम आणि समाजाच्या विविध क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समाजावर सकारात्मक प्रभाव पडला होता.

रांजणगाव गणपती येथील लवांडेवस्ती (देवाचीवाडी) परिसरात ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे वास्तव्य होते. मोठ्या कष्टातून त्यांनी शेती करताना मुलगा अंकुश लवांडे यांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले होते. धार्मिक क्षेत्रासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. विणेकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने रांजणगाव गणपती परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, एक बहीण, पुतणे उजोजक गणेश लवांडे, माऊली लवांडे, देविदास लवांडे, संदीप लवांडे, रवींद्र लवांडे, रोहिदास लवांडे, नातू उद्योजक अविनाश कुटे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे हे त्यांचे पुत्र होत.

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

5 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

5 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

21 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago