rain
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे, आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, जांबुत, वडनेर, पिंपरखेड, काठापूर, फाकटे, निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, सविंदणे , शरदवाडी या परिसरात आज (मंगळवार) जोरदार पाऊस झाला.
पिके पाण्याअभावी धोक्यात असताना कुकडी नदीला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. सलग तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने तूर्तास तरी जमिनीची तहान भागली असून जनावरांचा चारा आणि पिके बहरणार आहेत. या पावसाने विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढू शकते, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
पावसामुळे काढणीला आलेले डाळिंब पिकाची मात्र शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. पाऊस पडल्यानंतर बुरशी, किड रोग निवारणासाठी लगेचच औषधांची फवारणी करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्याने त्रासलेले नागरीक पावसाच्या ओलाव्याने थंडावले आहेत.
शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…
Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…