petrolpump-fire

Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…

महाराष्ट्र मुख्य बातम्या

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई असते. पेट्रोल पंपावर फोन उचलून नये अथवा वापरू नये अशा वारंवार सूचना सांगितल्या जातात. पण, ऑनलाईन पेमेंट किंवा काही महत्त्वाचे फोन आल्यानंतर उचलले जातात. फोनची रिंग वाजली आणि गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील एका पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार घडला. बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरणे सुरू होते. त्याच वेळी अचानक फोन वाजला. पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. आग पाहून मोठा गोंधळ उडाला. संबंधित व्यक्तीने गाडी पेट्रोल पंपपासून काही अंतर लांब नेली. पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.

दरम्यान, प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यामुळे पेट्रोल पंपावर असताना सतर्क राहाणे गरजेचे आहे.

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

Video: दुचाकीवर कोंबड्या, श्वानासह किती जण बसलेत मोजाच…

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

Video: चक्क खाटेपासून बनवली ‘फोर व्हिलर’…