Ramdas Thite

प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!

शिरूर तालुका

शिक्रापूरः श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना शिक्षण क्षेत्रातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी याकरिता कार्यरत अग्रणी सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज सोसायटी यांचे वतीने राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी उपजिल्हाधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख व अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांचे सुलभीकरण, भाषा व गणित विषयातील क्षमतांची संपादणुक करणे, दहावी पर्यंत मुलीच्या गळतीचे प्रमाण शून्य टक्के करणे, कृती युक्त व ज्ञानरचनावादी अध्ययन – अध्यापन यावर भर देणे, प्रश्नमंजुषा व विज्ञान कट्टा उपक्रम, संशोधन व पर्यावरण संवर्धनास चालना, गुणवत्ता, प्रशासन, ग्रामीण परिसरांत अल्पावधीत सर्वोत्तम निकाल परंपरा, मुलींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष सुविधा याबाबत थिटे यांचे उल्लेखनिय योगदान लक्षात घेउन सदर पुरस्कार प्रदान करणेत आला. दादर (मुंबई) येथील शिवाजी नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, सेकंडरी एम्प्लॉईज सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकात पाटील, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, राज्य आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, प्राचार्य अशोक सरोदे, बापूसाहेब लगड, संजीव मांढरे, बाळासाहेब चव्हाण, आविनाश क्षिरसागर, मनोज नायकवाडी, दत्तात्रय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते . त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुगंध उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी अभिनंदन केले आहे.