शिरूर तालुका

ऐन दिवाळीत कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीसमोर दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन…

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील दिव्यांगांनी ऐन दिवाळी सणामध्ये ग्राम पंचायत कोरेगाव भीमा (ता. शिरूर) समोर दिव्यांग निधि जमा करतो, असे आश्वासन देत फसवणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या गलथान व निर्दयी कारभारविरोधात मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले.

दिव्यांगांचे पैसे जमा करायचे नव्हते तर आमच्याशी खोटे कशाला बोलायचे? आम्हाला महाराष्ट्र बँक व पि डी सि सी बँकेत चकरा का मारायला लावल्या? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवक रतन दवणे यांच्यात दिव्यांग बांधावाप्रती माणुसकी जिवंत आहे का? असा प्रश्न निर्माण होत असून यावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिरूर तालुक्याचे गट विकास अधिकारी डोके हे कार्यवाही करणार का? असा प्रश्न निर्माण होत असून प्रहार दिव्यांग संघटना मात्र याबाबतीत आंदोलनावर ठाम असून, ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

प्रहार संघटना याबाबत आक्रमक झाली असून, ऐन दिवाळी सणामध्ये दिव्यांग बांधवांच्या निधीबाबत खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या कारभाराविषयी पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे दिव्यांग संघटनेचे राज्याचे पदाधिकारी धर्मेंद्र सातव यांनी सांगितले. ग्रामसेवक रतन दवणे यांच्या गलथान व दिव्यांग बांधवांच्या भावनेशी खेळणाऱ्या ग्रामसेवक दवणे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, ग्रामसेवक रतन दवणे यांची कार्यालयीन कामकाज चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त दिव्यांग निधी जमा झाल्यावर दिवाळीचा सण गोड करू, अशी स्वप्ने पाहणाऱ्या दिव्यांग बांधवांची दिवाळी मात्र कोरडीच राहिली. ग्रामसेवक रतन दवणे यांनी नुसतीच आश्वासने देत तुम्हाला दिवाळीत पैसे जमा करतो असे आश्वासन देत दिशाभूल केली, इतक्यावरच ग्रामसेवक दवणे थांबले नाहीत तर त्यांनी दिव्यांगांना पि डी सी सी बँकेत चेक जमा केला आहे असे सांगताच मोठ्या आशेने दिव्यांग बांधव अगदी चालता येत नसतानाही सरपटत, कोणी काठीचा आधार घेत, एकमेकांचा आधार घेत बँकेत गेले असता त्यांना बँकेत पैसे जमा केले नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी कुंडलिक वायकुळे यांनी बँकेचे स्टेटमेंट काढले त्यातही रक्कम जमा झाली नसल्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांच्या लक्षात आले की ग्रामसेवक आश्वासन देत तोंडाला पाने पुसत आहे. दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा निर्दयी प्रयत्न करण्यात येत असल्याने ग्राम पंचायत कार्यालयासमोर दिव्यांग जमा होऊन ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायतीचा निषेध म्हणून मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले.

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना नुसती मिठाई दिली व शुक्रवार किंवा जास्तीत जास्त शनिवार पर्यंत खात्यात पैसे जमा होतील असे ग्रामसेवक रतन दवणे यांनी सांगितले. यावर दिव्यांग बांधवांनी ग्रामसेवक दवणे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण प्रत्यक्षात सोमवार आला तरी दवणे यांनी निधी जमा केला नाही. यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेता बंद करून ठेवला. पण याबाबत गट विकास अधिकारी डोके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबधित प्रकरणात राठोड साहेबांना पाठवून चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या खात्यात शिल्लकच नसल्याचे ग्रामसेवक रतन दवणे सांगत असून कामगारांना पगार व बोनस दिल्याने शिल्लक नसल्याचे धर्मेंद्र सातव यांना सांगितले. यावर सातव यांनी दिव्यांगांचा निधी वेळेत का वितरीत करत नाही त्याचा आणि ग्राम पंचायत शिल्लक यांचा संबंध काय ? मग अपंग निधी इतर ठिकाणी वापरला जात आहे काय ? जर वापरत असतील त्याचा अधिकार ग्राम पंचायतीला आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मागील महिन्यात एकूण किती रक्कम जमा झाली व कोणाच्या खात्यावर किती रक्कम जमा केली याचा तपास जिल्हा परिषदेकडून करण्यात यावा तसेच संबधित ग्रमसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधला गट विकास अधिकारी डोके यांनी संबधित प्रकरणी राठोड यांना चौकशी करण्याबाबत सांगितले असून संबधित प्रकरणाची सर्व माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. याबाबत राठोड यांनी संबधित प्रकरणी दिव्यांग बांधवांचा अर्ज प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

या आंदोलनावेळी तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, कोरेगाव भीमा प्रहस संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ गव्हाणे, माणिक सोनवणे, अशोक ढेरांगे, यश रमेश गव्हाणे, बलभीम मेटे, संतोष धेरंगे, वंदना संतोष शिर्तोडे, सोमनाथ परदेशी, गोरक्ष गेना जाधव, संतोष साहेबराव कांचन,परशुराम घावटे, ज्ञानेश्वर भांडवलकर दिव्यांग बांधव उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांच्या निधीबाबत खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भीमा यांच्या कारभाराविषयी पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार
– धर्मेंद्र सातव

दिव्यांग बांधवांचा तातडीने निधी जमा करण्यासाठी प्रयत्न करू, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा एक पगार व दोन पगार बोनस जमा केले. यामुळे निधी शिल्लक नसल्याने निधी जमा करता आला नाही. तातडीने निधी जमा करू.
– ग्रामसेवक रतन दवणे, ग्राम पंचायत कोरेगाव भीमा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago