शिरूर तालुका

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : काठापूर खुर्द (ता. शिरूर) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे आज (शुक्रवार) हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे यांच्यावर काठापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. थिटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून तर सध्या त्यांच्या पत्नी सीमा थिटे या काठापूर खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत.

थिटे यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या व पत्नीच्या पदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे तसेच सर्वसामान्य जनतेची कामे करण्यामध्ये मोठे योगदान दिले होते. थिटे यांचे गावच्या जडणघडणीबरोबरच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते.

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापू पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शिरूर – आंबेगाव तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, टाकळी हाजीचे सरपंच दामू घोडे, बाळासाहेब भोर, खरेदी विक्री संघांचे संचालक बाबाजी निचित, संपत पानमंद, माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, शुभांगी पडवळ यांचेसह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी शोकाकुल वातावरणात थिटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चाताप आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे.

सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट; पाहा मानधनाची रक्कम…

शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

22 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago