शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रितम पाटील

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रीतम पाटील यांची वर्णी लागली आहे. प्रितम पाटील हे २०१७ ला एमपीएससी (MPSC) परीक्षा पास करत प्रथम ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व भिवंडी महानगरपालिका येथे ही सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. काही दिवसांपुर्वी शिरुरनगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर प्रितम पाटील यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

आपला कार्यभार सांभाळताना शिरुर शहरातील अडचणी व स्मिता काळे यांच्या काळात सुरु असणाऱ्या कामांची पुर्ण माहिती पाटील यांनी घेत, आपणही यापुढील कामकाजात पर्यावरण विषयी कामांना प्राधान्य देऊ तसेच नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीच्या किनारपट्टीची सुधारणा करुन ‘वॉक वे’ अंतर्गत असणारे काम मार्गी लावणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

 

तसेच काही वर्षांपुर्वी पाण्याने तुडुंब भरुन वाहणाऱ्या मोती नाल्याला आत्ता जे गटाराचे स्वरुप आले आहे ते थांबविण्याचा व त्याच्या पुनःप्रवाहासाठी जुन्या पद्धतीने दगडी भिंती घालुन प्रवाह सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. शिरुर शहरातील नागरीकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार राहुल पिसाळ यांनी मांनले.

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण