शिरूर तालुका

शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान!

शिरूर (अरुणकुमार मोटे): कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस “जनकल्याण सेवा सन्मान”हा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार सोहळा नुकताच कराड येथे पार पडला .यावेळी सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संजय सुड्रिक व चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शिरूर येथे आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही गेल्या आठ वर्षांपासून विशेष मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. मुलांना दैनंदिन, शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्य शिकवून सक्षम बनविणे, मुलांचे खुशी निवासी केंद्र मध्ये संगोपन व सांभाळ केला जातो. वैवाहिक, कौटुंबिक समुपदेशन करणे यासाठी संस्था कार्य करत आहे.

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या संस्थापिका ॲड. राणी ताई चोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अविनाश धर्माधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन कौतुक केले. यावेळी जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके आदी उपस्थित होते.

राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago