SARPANCH

सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट; पाहा मानधनाची रक्कम…

महाराष्ट्र

मुंबई: ग्राम पंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती.

सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट
सरपंचांना १० हजारांपर्यंत
आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पूर्वी पाच हजार मानधन होते.

उपसरपंचांना चार हजारांपर्यंत
सरपंचाच्या तुलनेत उपसरपंचाला अर्धे मानधन आहे. आठ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर चार हजार रूपये मिळतील.

जबाबदारीच्या मानाने अत्यल्प मानधन
सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत कमी मानधन मिळते.

वाढीव मानधन लोकसंख्या मानधन
० ते २००० : ६००० (सरपंच) २००० (उपसरपंच)
२००० ते ८००० : ८००० (सरपंच) ३००० (उपसरपंच)
८००० हून जास्त : १०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)

ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या टेबलवर बसूनच प्यायला दारू…

शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर “भावी आमदार” म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….

शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…

महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकली चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौल…