शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामस्थांना घडवली विमानाने काशी यात्रा अन् गंगापूजन सोहळा…

शिक्रापूर : निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून विमानाने काशी यात्रेला गेलेल्या शिव भक्तांचे सामूहिक गंगापूजन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामस्थांना विमानाने काशी दर्शन घडविल्याची परिसरात जोरदार चर्चा असून, सरपंच बापूसाहेब काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील 160 शिवभक्त विमानाने मुंबई ते काशी असा विमानप्रवास करून पुढे अयोध्या, प्रयाग राज, चित्र कुट तिर्थक्षेत्र यात्रा दर्शनासाठी गेले होते. हे सर्व तीर्थक्षेत्र करून आल्या नंतर निमगाव म्हाळुंगी येथे गावात सामूहिक गंगापुजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी गंगापुजन, नंतर मिरवणूक ढोलताशांच्या गजरात लेझीमपथकाच्या तालावर शिव भक्तांची जंगी मिरवणूक काढून शिव भक्तांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण करण्यात आली होती. यावेळी जय श्री राम च्या घोषणा देऊन सर्व परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर मान्यवर सत्कार समारंभ तसेच मनोगत पार पडले. यामध्ये बिग बॉसफेम अभिजित बिचुकले यांची प्रमुख उपस्थिती सर्वांची आकर्षित ठरले.

सदर कार्यक्रम प्रसंगी निमगाव म्हाळुंगीचे मा. सरपंच तथा विमानाने काशी, अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट तीर्थयात्रेचे आयोजक बापूसाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले तर भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष जयेश शिंदे, आमदार माऊलीआबा कटके यांचे बंधू अनंता कटके, बिगबॉस फेम अभिजित बिचुकले, भाजपा किसान मोर्च्या पुणे जिल्हा सरचिटणीस शरद रासकर, निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच रावसाहेब चव्हाण यांची मनोगत झाली. नंतर ह भ प‌‌‌ वारकरीरत्न श्री चैतन्य महाराज नाशिककर यांची भक्तिमय वातावरणात कीर्तनरूपी सेवा सादर झाली व शेवटी महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी सदर तीर्थयात्रेचे सह आयोजक प्रसिद्ध कीर्तनकार हभप गजानन महाराज इंगोले, संपूर्ण यात्रा सफल होण्यासाठी मेहनत घेणारे शरद रासकर,बाळासाहेब चव्हाण, दिलीप चव्हाण, नामदेव काळे, दिलीप विधाटे, अंकुश नाणेकर, पोपट भागवत, त्रंबकराव चव्हाण, हभप माऊली महाराज पजई, कुंडलिक महाराज मीरासे, शुक्रचार्य महाराज अवचार, सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाडळे, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे, रायचंद गव्हाणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रभाकर लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम चव्हाण, कोमलताई चव्हाण सी आर फी एफ जवान, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा गावडे, दादा पवार सर, बापू गावडे, संतोष पाटील, कांतीलाल चव्हाण, दादाभाऊ काळे, अंगणवाडी जेष्ठ सेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या रंजना चव्हाण, पदमा थोरात, पार्वतीबाई भागवत, वैशाली चव्हाण, आशाताई धनवते, शारदा गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन बापूसाहेब काळे मा सरपंच निमगाव म्हाळुंगी, तथा अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठाण आणि संयोजक मन की बात पुणे जिल्हा यांनी केले होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नामदेव भोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निमगाव म्हाळुंगी गावचे आदर्श सरपंच राजेंद्र विधाटे यांनी केले.

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांचे मोठं मन; ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन…

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या आठवणींना उजाळा…

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

निमगाव म्हाळुंगी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन!

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

4 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

18 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago