nimgaon-mahalungi-sankul

निमगाव म्हाळुंगी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन!

शिरूर तालुका

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी मध्ये विविध विकासकामांचे उदघाट्न भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांच्या हस्ते आणि पं. स.सदस्य विजय रणसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री म्हसोबा महाराज ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी व्यापारी संकुलाचे भूमिपूजन त्याचप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेचे भूमिपूजन तसेच स्मशानभूमी स्वागत कमानीचे भूमिपूजन आणि महादेव मंदिराजवळील चर्मकार वस्तीतील नागरिकांसाठी सभागृहाचे भूमिपूजन अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन जयेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे, नवनाथ भुजबळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य सरचिटणीस, राजेंद्र विधाटे माजी सरपंच, जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे, जय जवान माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत आबा चव्हाण, निमगाव म्हाळुंगीच्या उपसरपंच अश्विनी लांडगे, कविता चौधरी, ग्रा.प.सदस्य डॉ. सचिन चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, माजी सैनिक शांताराम धोत्रे, शंकर भुजबळ, मारुती चव्हाण, शंकर चव्हाण, दत्तात्रय रणदिवे, लहू विधाटे, सुखदेव रणसिंग, योगेश शिवले आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

सदर भूमिपूजन वेळी सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर सारंग धुमाळ आणि मछिंद्र गुंगणे यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या दर्जाचे करून देणार आहोत असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. सदर भूमिपूजन वेळी जयेश शिंदे यांनी गावाला निधी कमी पडू देणार नाही. अजून जास्तीत जास्त निधी देऊन गावचा कायापालट करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प. स. सदस्य विजय रणसिंग यांनी केले असून, सूत्रसंचालन सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले तर आभार निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच राजेंद्र विधाटे यांनी केले. सदर कामाचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थ आनंदी झाले असून, सदर कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी…

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…