आरोग्य

डोळ्यांना लांबचं कमी दिसत, ही भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात लालटुचूक गाजर दिसायला सुरूवात होते. गाजराचा वापर करून तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांत गाजराचे सेवन करायचे असेल तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही गाजराचे सेवन केले तर बरेच फायदे मिळतील.

गाजरात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन के, पॅटोंथेनिक एसिड, फॉलेट, पोटॅशियम, आयर्न, कॉपर यांसारखी तत्व असतात. गाजराचे सेवन केल्यानं इम्यूनिटी चांगली राहते. इम्यूनिटी मजबूत राहिल्यानं शरीराचा संक्रमणापासून बचाव होतो. डोळ्यांवरही सकारात्मक परिणाम होतो. गाजराचे सेवन तुम्ही कोणत्या पद्धतीनं करू शकता ते समजून घेऊ.

गाजराचे सेवन कसे करावे

गाजराचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करू शकता. जसं की गाजरचा हलवा, गाजराचा ज्यूस, गाजराचे सॅलेड, गाजराची भाजी, गाजराचे सूप इत्यादी. गाजरात व्हिटामीन ए, बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. गाजरात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते आणि शरीराला मदत होते.

गाजरात फायबर्सचे प्रमाण पुष्कळ असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गाजराचे सेवन करू शकता. गाजराचे सेवन केल्यानं हृदयाचे आजार दूर होतात. यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

गाजरात व्हिटामीन सी असते ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत राहण्यास मदत होते. इम्यूनिटी मजबूत राहिल्यानं शरीराचा अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून बचाव होतो. गाजराचे सेवन केल्यानं त्वचा ग्लोईंग राहते. पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.

गाजरात ८८ टक्के पाणी असते. याव्यतिरिक्त यात फायबर्स असतात. ज्यामुळे वजन संतुलित राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त तुम्ही पूर्ण १ गाजर खाल्ल्यास तुम्हाला ८० कॅलरीज मिळतील ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहील आणि या भाजीचे सेवन केल्यानं वजन कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago