शिक्रापूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावातील विविध विकास कामांचे नुकतेच ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. निमगाव म्हाळुंगीचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी स्वतः उद्घाटन न करता गावातील ग्रामस्थांना उद्घाटन करण्याचा मान दिला. सरपंच बापूसाहेब काळे यांच्या या कृतीचे गावात कौतुक केले जात आहे.
शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन भाजपा किसान मोर्च्या प्रदेश सचिव तथा विद्यमान भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष जयेश शिंदे आणि राष्ट्रवादी शिरूर तालुका अध्यक्ष रविबापू काळे यांच्या विशेष प्रयत्नातून मा.प.सं. सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या सहकार्याने निमगाव म्हाळुंगीचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या गावातील विविध विविध विकास कामांचे “अनौपचारिक उद्घाटन” / “कार्य स्मरण” उत्साहात पार पडले.
सरपंच बापूसाहेब काळे म्हणाले, ‘सदर काम माझ्या सरपंच कार्यकाळात मंजूर झाले होते. गावकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून आपण या कामाचं स्मरण करून एक छोटं उद्घाटन केल आहे. यामध्ये श्री म्हसोबा मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता सिमेंटकाँक्रेटीकरण करणे, प्रकाश गायकवाड वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट काँक्रेटीकरण करणे, नवचैतन्य वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, काळे वस्ती ते सोरटाय मळा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, दशक्रिया घाट सुधारणा करणे, निमगाव म्हाळुंगी ते ढेकणे वस्ती रस्ता करणे, भागवत वस्ती रस्ता काँक्रेट करणे इत्यादी कामांना मंजुरी मिळाली आहे.
रांजणगाव गणपती ते पालखी मार्ग प्रजिमा 19, आणि त्या वरील नवीन पूल बांधणे इत्यादी कामांना 10.50 कोटी, निमगाव म्हाळुंगी ते करंजावने रस्ता 6.50 कोटी इत्यादी रुपयांचा निधी सदर रस्त्यांना मंजूर करण्यात यश मिळाले आहे. वरील सर्व कामांचा अनौपचारिक पद्धतीने एक कामांचे स्मरण म्हणून उदघाटन यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी निमगाव म्हाळुंगी गावचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब काळे, जय जवान माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भिवाजी चौधरी, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, संचालक काकासाहेब करपे, दिलीपराव चव्हाण, वामनराव गव्हाणे, मारुती चव्हाण, साहेबराव पवार, दत्तात्रय शिवले, सुनील काळे, सतीश भोसले, पोपट भागवत, रामभाऊ कुटे, बाबुराव चौधरी, दत्ता भागवत, शिवाजी चौगुले, दिलीप चव्हाण, संतोष धोत्रे, आशाताई धनवटे, भीमा कुसेकर, राधा कुसेकर, नंदा कुसाळे, सुमन धोत्रे, विजय धोत्रे, विशाल कुसेकर, संतोष धोत्रे, मंगेश धोत्रे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या आठवणींना उजाळा…
निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!
निमगाव म्हाळुंगी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन!
निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!