शिरूर तालुका

पिंपळे खालसा शाळेची 1971 साला पासून ची शिष्यवृत्ती परंपरा कायम!

शिक्रापूरः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025 या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे खालसा (ता. शिरूर) या शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये झळकले. शिष्यवृत्तीची 55 वर्षांची परंपरा अखंडितपणे चालू ठेवली आहे. या शाळेचे आत्तापर्यंत 650 हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत.

शाळेत इयत्ता पहिली पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. पिंपळे खालसा गावातील आज पर्यंत 25 पेक्षा अधिक विद्यार्थी एमपीएससी व यूपीएससी या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाले आहेत. ‘पहिलवानांचे गाव ते अधिकाऱ्यांचे गाव’ अशी नवीन ओळख संपूर्ण महाराष्ट्रात या गावची झालेली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक रामदास थोरात यांनी दिली.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक दिलीप मारुती थोरात यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक दिलीप थोरात यांनी यापूर्वीही वाघाळे, वरुडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिष्यवृत्तीचे विद्यार्थी घडवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व सहकारी शिक्षक, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्ताराधिकारी मुकुंद देंडगे व वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर व शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व वर्ग शिक्षकाचे अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली अमिर धुमाळ व सर्व सदस्य, सरपंच सारिका धुमाळ, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच पालकांनी शाळेमध्ये येऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.

जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
1. तेजस्विनी सचिन भोसले 274 गुण
2. पृथ्वीराज नारायण चोपडी 274 गुण
3. ज्ञानेश्वरी रणजीत टेमगिरे 270 गुण
4. श्रेयश कांताराम शिंदे 270 गुण
5. कार्तिक अरुण कुरकुटे 268 गुण
6. प्रांजल विश्वास भोसले 266 गुण
7.प्रणितअतुल पानमंद 264 गुण
8. स्वरांजली निलेश धुमाळ 258 गुण
9. स्वराज अमोल धुमाळ 256 गुण
10. श्रद्धा मिलिंद शेळके 256 गुण
11. अद्विता अमित दळवी 256 गुण
12. ओम योगेश खैरे 252 गुण
13. पूर्वी हौशीराम इथापे 252 गुण
14. दूर्वा सतीश धुमाळ 250 गुण
15. प्रियल दीपक भाकरे 248 गुण
16. अथर्व शरद जाधव 248 गुण
17. तनिष्का उमेश धुमाळ 248 गुण
18. पायल तुकाराम दरेकर 248 गुण
19. मानसी प्रदीप भोसले 246 गुण
20. राजवीर काळूराम धुमाळ 244 गुण
21. अनया संदीप धुमाळ 244 गुण
22. शौर्य कैलास मासळकर 244 गुण

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेतील माजी विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा एकत्र…

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

5 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago