kalikamata-get-together

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

शिरूर तालुका

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालय सन 1998-1999चे माजी विद्यार्थी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आले होते. दिवाळीच्या सुटीत अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यशानंतरची शाबासकी, वर्गात बाकावर बसून केलेल्या ‘खोड्या, शाळेशी जोडलेले ऋणानुबंध उलगडत आणि शाळेतील संस्काराच्या बिजेमुळे घडलेल्याची ग्वाही देत ऐन दिवाळीच्या सुट्टीत कालिकामाता विद्यालयात वर्ग भरला होता. कार्यक्रमाला गुरुजन सतीश चंद्र पाटील, संजय मचाले, भास्कर वाबळे, बाळासाहेब शेळके, सुरेखा शेळके, संजय भोसले, प्रदीप लौंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेमुळे गुरुजनांमुळे आयुष्याचा पाया रचना गेला. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच ज्या सवंगड्यासोबत शिक्षणाची सुरववात केली, त्यांच्या सोबत जुन्या आठवणी जागृत झाल्या. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.

वाघाळे गावचा सुपुत्र आणि सेवानिवृत्त जवान विकास दंडवते यांनी भावना व्यक्त केल्या. शाळेपासून ते लष्करामध्ये जाण्यासाठी शाळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच जिद्द आणि मेहनतीची जोड किती महत्वाची आहे, हे सांगतानाच सर्वांचे आभार मानले. ‘आपल्या यशाची पायरी न थांबवता, लष्करामधून निवृत होऊन ते महाराष्ट्र पोलिस मध्ये रुजू होऊन पुन्हा एकदा देशसेवा करत आहेत. विकास दंडवते हे लष्करातील आठवणी आणि भावना व्यक्त करत असताना अनेकांना गहिवरून आले होते. अभिमानास्पद कामगिरी करत असल्यामुळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी विद्यार्थी अमोल गोरडे, विकास दंडवते, संदीप सोनवणे, राजू वीर, राहुल गोरडे, दिलीप थोरात, सिद्धेश बांगर, वनिता औटी, सविता फंड, कविता नवले, अर्चना चव्हाण, कीर्ति ठोंबरे, रामदास कारकुड, तानाजी भोसले, रमेश शिंदे, भानुदास थोरात, तुकाराम कारकुड, शहाजी भोसले, कैलाश भोसले, उत्तम कारकुड, प्रकाश बेंडभर, गिताराम भोसले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार विकास दंडवते यांनी मानले.

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!