shikrapur-ssc-get-together

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेतील माजी विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा एकत्र…

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेतील १९९३ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याने हा क्षण विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी आनंदाचा ठरला.

शिरूर तालुक्यातील कासारी फाटा येथील फार्म हाऊसवर झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून आले होते. परिपाठ घेऊन मेळाव्याची सुरुवात झाली आणि शालेय आठवणींनी सारे वातावरण भारावून गेले. तत्कालीन शिक्षक बाबुराव साकोरे, सूर्यकांत शिर्के, सोपान टेमगिरे, रमेश ठाकूर व शुभांजली जांभेकर यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पण, हे अनेकांना माहित नव्हते. कोणत्याही कामासाठी एकत्र येऊन मदत करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनीही मार्गदर्शन करताना पुढील वाटचालीसोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. शिक्षक, मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेच जण अनुभवत होते. अनेक जन ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते. आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी ताज्या केल्या.

डॉ. कोहिणकर यांचे आरोग्यविषयक व्याख्यान..
प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ डॉ. दत्ता कोहिणकर यांचे आरोग्यविषयक व्याख्यानही यावेळी झाले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्यामबापू सासवडे, प्रफुल्ल कामठे, प्रवीण कौटकर, मधुकर गिलबिले, राजेश गायकवाड, संदिप धायबर, आशा गोरडे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन मधुकर गिलबिले आणि पोपट इंगवले यांनी, प्रस्ताविक प्रफुल्ल कामठे यांनी तर श्यामबापू सासवडे यांनी आभार मानले.

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरुर विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षांनी स्नेह संमेलनानिमित्त भरली शाळा

बापूसाहेब गावडे विद्यालयात तब्बल ४० वर्षापुर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न…