शिरूर तालुका

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

प्रितम-प्रकाश नगरमधील नागरिकाच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील प्रितम-प्रकाश नगर येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करत तब्बल १ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद किशोर सावळेराम कवडे (वय ३९, व्यवसाय-नोकरी, रा. प्रितम-प्रकाश नगर, शिरूर, जि. पुणे) यांनी दिली असून त्यांनी आपल्यावर झालेल्या सायबर फसवणुकीबाबत सविस्तर माहिती पोलीसांना दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ८) जुलै रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास, किशोर कवडे यांच्या एचडीएफसी बँक, शिरूर शाखेतील खाते क्रमांक २२६०११४०००१८९० मधून दोन ऑनलाईन व्यवहारांद्वारे प्रत्येकी ५०,००० रुपयांची रक्कम, असा एकूण १ लाख रुपये अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफर करून काढून घेतले.

या व्यवहारांसाठी फिर्यादीला कोणताही ओटीपी (OTP), पासवर्ड किंवा पुष्टीसंदेश (confirmation alert) प्राप्त झालेला नाही. तसेच कवडे यांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपली बँक माहिती दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा प्रकार शुद्ध सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले रेफरन्स क्रमांक ५१८९२०१४७२८१ व ५१८९२०१४८८१७ असून, त्यावरून सायबर चोरट्यांनी अत्यंत हुशारीने आर्थिक फसवणूक केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे बँक ग्राहकाची कोणतीही सक्रिय भूमिका नसताना देखील बँक खात्यातून रक्कम काढली गेल्याने, सायबर सुरक्षेतील त्रुटी, तसेच बँकिंग प्रणालीतील संभाव्य दुर्लक्ष याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.शिरूर पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्ट व भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती, ओटीपी, युजरनेम-पासवर्ड कुणालाही न देता सतर्क राहावे, तसेच कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबाबत त्वरित पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.जर तुमच्याही खात्यातून अशी फसवणूक झाली असेल, तर 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क करा.किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. संदेश केंजळे-पोलीस निरीक्षक, शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

15 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

23 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago