शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर (मूळ रा. टिटवाळा रोड, अनाखर, ठाणे; सध्या रा. न्हावरे ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी भगवान डोर्लेकर याने फिर्यादी फिरोज शेख याच्याकडे “पुण्यात कामासाठी ३-४ दिवस जायचे आहे” असे सांगत त्याच्याकडे त्याची चारचाकी कार मागितली. त्यानंतर विश्वासाने फिरोज शेख यांनी आपली मारुती सुझुकी कंपनीची इरटीका (MH 14 FM 3581) ही कार आरोपीकडे दिली.

मात्र, ठरलेल्या वेळेत कार परत न करता आरोपीने ती स्वतःकडेच ठेवून अपहार केला आणि फरार झाला. काही दिवस वाट पाहूनही कार परत न मिळाल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी शिरुर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

13 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

13 तास ago